|Saturday, July 29, 2017
You are here: Home » उद्योग » 17-20 जानेवारी दरम्यान सरकारी कंपन्यांचा ईटीएफ17-20 जानेवारी दरम्यान सरकारी कंपन्यांचा ईटीएफ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा ईटीएफ घेऊन येणार आहे. 4,500 कोटी रुपये जमा करण्यासाठी ईटीएफ 17 ते 20 जानेवारी दरम्यान उघडण्यात येणार आहे, असे गुंतवणूक विभागाच्या सचिवांनी म्हटले. रिटेल गुंतवणूकदारांना यासाठी 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या ईटीएफ इश्यूमध्ये 1,500 कोटी रुपयांचे ग्रीनशू ऑप्शनसुद्धा असतील.

सरकारने यापूर्वी आणलेल्या ईटीएफने चांगली कामगिरी केली होती आणि पहिल्या सीपीएसई ईटीएफमधून 14.5 टक्के प्रतिवर्षी रिटर्न मिळाला होता. पहिल्या ईटीएफमध्ये रिटेल गुंतवणूकदारांना 17.2 टक्के रिटर्न मिळाला होता. रिटेलच्या 17.2 टक्के रिटर्नमध्ये लॉयल्टी युनिट्सचाही समावेश होता. मार्च 2014 मध्ये पहिला सीपीएसई ईटीएफ आणण्यात आला होता आणि या माध्यमातून सरकारी तिजोरीत 3 हजार कोटी रुपये जमा झाले होते. एक वर्षानंतर रिटेल गुंतवणुकदारांना लॉयल्टी युनिट्स जारी करण्यात आली होते. ईटीएफ हे स्टॉक एक्स्चेंमध्ये लिस्टेड फंड असतात आणि हे लिस्टेट फंड पीसएसयूमध्ये सरकारी गुंतवणुकीचा एक प्रकार असतो.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!