|Wednesday, June 21, 2017
You are here: Home » उद्योग » वाहन विक्रीत 16 वर्षांतील सर्वात मोठी घटवाहन विक्रीत 16 वर्षांतील सर्वात मोठी घट 

नोटाबंदीने विक्री मंदावली  पुढील दोन ते तीन महिने मंदी राहण्याचा ‘सियाम’चा अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम डिसेंबरमध्ये गाडय़ांच्या मागणी, विक्रीमध्ये दिसून आला. ऑटो क्षेत्राची संघटना सियामच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये मागणीमध्ये घट झाली आणि विक्रीत 18.66 टक्क्यांनी कमी आली. गेल्या 16 वर्षातील ही सर्वात मोठी मासिक घट आहे. यापूर्वी डिसेंबर 2000 मध्ये वाहन विक्री मंदावली होती. दर वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये प्रवासी कार विक्री 8.1 टक्क्यांनी घसरत 1.58 लाख युनिट राहिली. वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 1.4 टक्क्यांनी घसरत 2.28 लाख युनिट झाली.

दुचाकी वाहनांच्या बाबतीत विक्रीचा सर्वात मोठा फटका या प्रकाराला बसला. वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये दुचाकी वाहनांची विक्री 22 टक्क्यांनी घसरत 9.10 लाख युनिट झाली. याचप्रमाणे वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये मोटारसायकल वाहनांची विक्री 22.5 टक्क्यांनी घटत 5.62 लाख युनिट राहिली. वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 5.1 टक्क्यांनी घटत 53,966 युनिट राहिली. दर वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री 12.4 टक्क्यांनी घटत 22,788 युनिट राहिली. वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये हलक्या वाहनांची विक्री 1.2 टक्क्यांनी वाढत 31,178 युनिट राहिली.

डिसेंबर महिन्यात वर्षाच्या आधारे वाहनांची निर्यात 3.1 टक्क्यांनी घटत 3.01 लाख युनिट राहिली. दर वर्षाच्या आधारे डिसेंबरमध्ये युटिलिटी वाहनांची विक्री वाढत 58,309 युनिट राहिली.

नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा परिणाम ऑटो क्षेत्राच्या विक्रीवर दिसून आला. पुढील दोन ते तीन महिने हा परिणाम दिसेल. ही मंदी अस्थायी असून अर्थसंकल्पात सरकारकडून नागरिकांसाठी कोणत्या योजना जाहीर करण्यात येतात त्यानुसार ही मंदी राहणार आहे, असे सियामचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू माथूर यांनी म्हटले.

Related posts: