|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘माझा सिनेमा आणि सबकुछ’ कार्यक्रम मालवणात‘माझा सिनेमा आणि सबकुछ’ कार्यक्रम मालवणात 

मालवण : ‘मी सिनेमाबरोबर वाढलो, जगलो. सिनेमा हा माझ्या ध्यास आहे, श्वास आहे आणि त्याच्या प्रचार-प्रसाराचा मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे,’ एवढीच स्वतःची ओळख करून देणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजक अशोक राणे यांच्या ‘माझा सिनेमा आणि सबकुछ’ या कार्यक्रमाचे आयोजन येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता सेवांगणच्या सभागृहात मोफत करण्यात आले आहे.

  सिनेमाचा विद्यार्थी, फिल्म सोसायटी संघटक, समीक्षक, इतिहासकार, संशोधक, अध्यापक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा आयोजक, चित्रपट संग्राहक, ज्युरी सदस्य, लघुकथा-पटकथा लेखक, दिग्दर्शक अशा सिनेमासंबंधित नानाविध भूमिका बजावणारे अशोक राणे नेहमीच आपण ‘एक सिनेमा पाहणारा माणूस’ असेच सांगून आपल्यातील श्रेष्ठत्व कधीही दाखवून देत नाहीत. त्यांनी प्रथमच सिंधुदुर्गात लघुचित्रपटांच्या निर्मितीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन मालवणात केले आहे, असे सेवांगणतर्फे प्रकाश कुशे यांनी स्पष्ट केले. सेवांगणचे कार्योपाध्याक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर, कार्यवाह अरविंद सराफ, चारुशिला देऊलकर आदी उपस्थित होते.

 रसिकांनी लघुपट कशाप्रकारे पाहायचा असतो, हेही शिकविण्यात येणार आहे. राणे यांच्या ‘सिनेमाची चित्तरकथा’ या त्यांच्या पुस्तकाला सिनेमाविषयक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लघुपट महोत्सव, बाल-कुमार चित्रपट महोत्सव, माहितीपट महोत्सव यांच्या निमित्ताने ज्युरी सदस्य, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष, समीक्षक आणि चित्रपट रसिक या भूमिकेतून ते वर्षाला जवळ-जवळ 250 चित्रपट पाहतात. चित्रपट दिग्दर्शन करणारा पहिला मराठी समीक्षक हा बहुमान अशोक राणे यांना मिळाला आहे, असेही कुशे यांनी स्पष्ट केले.

मालवणात लघुचित्रपट महोत्सवासाठी प्रयत्न

मालवणात लघु चित्रपटाची कार्यशाळा होत असताना येथे महोत्सव घेण्याबाबतही चर्चा होणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या आवडीचीही माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. ‘अँन्थोनी गोन्साल्वीस-द म्युझिक लीजंड’ या पारितोषिक प्राप्त माहितीपटाबरोबरच ‘सिंगिंग इन सिनेमा मस्ती भरां है समा’, ‘दशावतार-लोककला कोकणची’, ‘नमन-खेळे’, ‘बिईंग विथ अपू’ आणि संवादिनीसाधक-पं. तुळशिदास बोरकर हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर माहितीपट आहेत. वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे हे मूळ गाव असलेल्या या सिंधुदुर्गवासियाने आपल्या अभ्यासाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात स्वतःचे मानाचे स्थान निर्माण केले आहे. सिनेमा कसा बनवावा व कसा पाहवा, संगीत व तांत्रिक बाबी याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहरातील कलेचा आनंद घेणाऱया सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण परिवाराने केले आहे.   

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!