|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुचाकी गेली आयशर टेम्पोच्या खाली

दुचाकी गेली आयशर टेम्पोच्या खाली 

नांदगांव : हुंबरट तिठा येथे दुचाकी आयशर टेम्पोच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार अक्षरशः जखमी होण्यावर बालबाल बचावले. फोंडाघाट येथून आयशर टेम्पो नांदगांवकडे वळत होता तर दुचाकीस्वार नांदगांवहून थांबलेल्या एसटीला ओव्हरटेक करून कणकवलीच्या दिशेने येत होते. समोरील आयशर टेम्पोच्या खाली दुचाकी जात असताना दुचाकीवरील दोघांनीही बाजूला उडी घेत दुचाकी सोडून दिल्याने ते बचावले. हा अपघात मंगळवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास घडला.

अपघातात सचिन रामचंद्र दाभोलकर (36), किरण सखाराम अवसरे (36, रा. आडेली) हे दोघे जखमी झाले. त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आयशर टेम्पो (एमएच07 1431) हा लाकूड गिरणीवरून हुंबरट तिठा येथून नांदगांवच्या दिशेने पूर्णपणे ‘यु’ टर्न घेत वळत होता. त्याचवेळी नांदगांवहून कणकवलीच्या दिशेने येणारी एसटी प्रवासी उतरविण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती. थांबलेल्या एसटीला ओव्हरटेक करून सचिन व किरण हे दोघे दुचाकीस्वार आपली दुचाकी घेऊन (एमएच07 एए 6184) पुढे आले. मात्र समोरील आयशर टेम्पोच्या खाली आपली दुचाकी जाणार हे लक्षात येताच त्यांनी आधीच दुचाकी सोडून दिली. यात दोघेही गाडीवरून फेकले गेल्याने बालबाल बचावले.

मात्र दुचाकीही आयशर टेम्पोच्या खाली जावून अडकून दुचाकीचे मोठे नुकसान झाले. आयशर टेम्पोचा चालक सुनील बांदिवडेकर (40, नांदगांव) यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानंतर जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात व तेथून ओरोस येथील जिल्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related posts: