|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » कृष्णमूर्ति फ्लिपकार्टचे सीईओकृष्णमूर्ति फ्लिपकार्टचे सीईओ 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. टायगर ग्लोबलचे माजी व्यवस्थापक कल्याण कृष्णमूर्ति यांना फ्लिपकार्टच्या नवीन सीईओपदी नियुक्त करण्यात आले. यापूर्वी या पदावर सचिन बन्सल विराजमान झालेले होते. सचिन यांच्यासाठी नवीन पद तयार करण्यात आले आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांना समुहाचे प्रमुख बनविण्यात आले. कृष्णमूर्ति यांना जून 2016 मध्ये वाणिज्य विभागाच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. सध्या टायगर ग्लोबल ही फ्लिपकार्टची सर्वात मोठी समभागधारक कंपनी आहे.

ई-कार्टचे सीईओ साईकरन कृष्णमूर्ति यांना नवीन जबाबदारी देण्यात आली. साईकरन हे बिनी बन्सल यांच्याबरोबर काम करतील. फ्लिपकार्ट समुहाच्या फॅशन विभाग मिंत्रा-जबॉन्गचे सीईओ अनंत नारायण आणि फोन पे या देयक विभागाचे सीईओ समीर निगम हे बिनी बन्सल यांना अहवाल सादर करतील. फ्लिपकार्टचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी नितीन सेठ यांना सीओओ पदावर नियुक्त करण्यात आले. ते ई-कार्ट आणि ग्राहक सेवा विभागावर नजर ठेवतील.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!