|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » तिमाही निकालामुळे बाजारात तेजीचे वातावरणतिमाही निकालामुळे बाजारात तेजीचे वातावरण 

बीएसईचा सेन्सेक्स 173, एनएसईचा निफ्टी 52 अंशाने वधारला

वृत्तसंस्था / मुंबई

मंगळवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. बाजारात आलेल्या तेजीत निफ्टीने 8,293 आणि सेन्सेक्सने 26,900 चा टप्पा पार करण्यास यश मिळविले. दिवसाच्या अखेरीस निफ्टी 8,280 वर आणि सेन्सेक्स 26,900 च्या जवळ बंद झाला.

बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 173 अंशाने वधारत 26,899 वर बंद झाला. एनएसईचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 52 अंशाने वधारत 8,288 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही तेजी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वाढत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

मेटल, एफएमसीजी, ऑटो, बँकिंग, कॅपिटल गुड्स, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल ऍन्ड गॅस आणि पॉवर समभागात सर्वात जास्त खरेदी दिसून आली. बँक निफ्टी 0.7 टक्क्यांनी वधारत 18,410 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.4 टक्के आणि खासगी बँक निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वधारला.

निफ्टीचा मेटल निर्देशांक 1.5 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्के आणि ऑटो निर्देशांक 1.3 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा कॅपिटल गुड्स निर्देशांक 1 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1 टक्के, ऑईल ऍन्ड गॅस निर्देशांकात 0.75 टक्के आणि पॉवर निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारला.

दिग्गज समभागांची कामगिरी

हिंडाल्को, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा स्टील, एशियन पेन्ट्स आणि एचडीएफसी बँक 4-1.5 टक्क्यांनी वधारत बंद झाले. ग्रासिम, ऍक्सिस बँक, अंबुजा सिमेन्ट, एसीसी, डॉ. रेड्डीज लॅब, ल्यूपिन, एचडीएफसी आणि एनटीपीसी 1.2-0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

मिडकॅप समभागात एबीबी इंडिया, एमआरएफ, नाल्को, एमआरपीएल आणि बीईएल 12.7-4 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात कॅप्लिन लॅब्स, ताज जीव्हीके, डीसीएम श्रीराम आणि प्रकाश इन्डस्ट्रीज 12.5-9.4 टक्क्यांनी मजबूत झाले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!