|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘बाबर-3’ क्षेपणास्त्राच्या चाचणीचा दावा खोटा ?

‘बाबर-3’ क्षेपणास्त्राच्या चाचणीचा दावा खोटा ? 

पाकची चित्रफित संगणकनिर्मित असल्याचा दावा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

 ‘बाबर-3’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीच्या पाकिस्तानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. संरक्षण जाणकारांच्या नजरेत पाकिस्तानी लष्कराने क्षेपणास्त्र चाचणीची जी चित्रफित जगासमोर सादर केली, ती संगणकनिर्मित आहे. बाबर-3 साठी सांगितल्या जाणाऱया क्षमतेचा विकास करण्यास पाकिस्तान अजून सक्षम नसल्याचा विश्लेषकांचा दावा आहे.

हे क्षेपणास्त्र पाकला चीनकडून मिळाले असावे. चित्रफित निर्मितीसाठी संगणकाची मदत घेतली आहे. संशयाचे सर्वात मोठे कारण क्षेपणास्त्राच्या प्रवासाच्या वेळेवरून असल्याचे संरक्षणतज्ञ माहरुफ रझा यांनी म्हटले.

पठाणकोटमधील सॅटेलाईट इमेजरी विश्लेषक समवेत अनेक तज्ञांनी तांत्रिक पुरावे सादर करत पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणीची बनावट चित्रफित जगाला दाखविल्याचे सांगितले. तसेच क्षेपणास्त्र प्रक्षेपण दाखविण्याकरता कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर करण्यात आल्याचेही म्हटले गेले. चित्रफितीत क्षेपणास्त्राचा रंग पांढऱयावरून बदलत नारिंगी होत असल्याचे दिसते तसेच त्याचा वेग एवढा अधिक दाखविण्यात आला की तो प्रत्यक्षात गाठणे शक्यच नाही असा आरोप निवृत्त कर्नल भट यांनी केला.

पाकिस्तानचा दावा

भारताने अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर पाकिस्तानने आपण देखील पहिल्यांदाच पाणबुडीतून बाबर-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला. पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे संचालक  मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ही माहिती ट्विटरवर दिली होती. परंतु आता या चाचणीच्या चित्रफितीवर संशयाचे अनेक ढग जमा झाले आहेत. पाकनुसार आण्विक क्षमता संपन्न बाबर-3 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 450 किलोमीटर असून ते हिंदी महासागरातील एका गुप्त ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले. बाबर-3 अण्वस्त्रs वाहून नेण्यास सक्षम असून यामुळे पाकिस्तानची अणू हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेत वाढ होईल असा दावा करण्यात आला होता.

क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारत आघाडीवर

अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीनंतर भारत आता क्षेपणास्त्र क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अग्नी-5 नंतर भारत अग्नी-6 वर देखील काम करत आहे. हे क्षेपणास्त्र एकाचवेळी अनेक शस्त्रास्त्रs वाहून नेण्यास सक्षम असेल आणि शत्रूच्या डिफेन्स सिस्टीमला मात देण्यासाठी तांत्रिक रुपाने पात्र असेल.

Related posts: