|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 5 राज्यात नेत्यांची होर्डिंग्ज झाकण्याचे आयोगाचे आदेश

5 राज्यात नेत्यांची होर्डिंग्ज झाकण्याचे आयोगाचे आदेश 

नवी दिल्ली

 निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱया 5 राज्यांच्या अधिकाऱयांना नेत्यांची सर्व होर्डिंग्ज आणि जाहिराती झाकण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही हयात राजकीय पदाधिकारी किंवा पक्षाच्या कामगिरींचा उल्लेख असणाऱया होर्डिंग्ज झाकल्या जातील. निर्देशावर अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित राज्यांच्या निवडणूक यंत्रणेला देण्यात आली आहे. याआधी निवडणुकीच्या मुख्य अधिकाऱयाने 4 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला होता. होर्डिंग्समधील छायाचित्रांना झाकले जावे, जेणेकरुन निर्देशांचे पूर्णपणे पालन व्हावे असे आयोगाने म्हटले. तसेच यानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी आपली प्रतिमा उजळविण्यासाठी सरकारी निधीचा वापर करू शकत नाही. सोमवारीच काँग्रेसने आयोगासमोर हा मुद्दा मांडला होता.

पक्षाने उज्ज्वला योजनेच्या प्रसारासाठी तेल कंपन्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असणाऱया होर्डिंग्सवर आक्षेप घेत ते हटविण्याची मागणी केली होती. 4 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा तसेच मणिपूर येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.