|Saturday, July 29, 2017
You are here: Home » क्रिडा » अवध वॉरियर्स उपांत्य फेरीतअवध वॉरियर्स उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथे सुरू असलेल्या दुसऱया प्रिमियर लीग बॅडमेंटन स्पर्धेत सायना नेहवालच्या अवध वॉरियर्स संघाने बेंगळूर ब्लास्टर्स संघाचा 4-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

या लढतीत अवध वॉरियर्सच्या सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांनी आपले सामने जिंकले. लंडन ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळविणाऱया सायना नेहवालने बेंगळूर ब्लास्टर्सची हाँगकाँगची बॅडमिंटनपटू चेयुंग निगेन ई हिचा 9-11, 11-5, 11-5 असा पराभव केला. तर पुरूष एकेरीच्या सामन्यात अवध वॉरियर्सच्या के. श्रीकांतने जागतिक बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात तिसऱया स्थानावर असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसनचा 11-9, 11-9 असा पराभव करून आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी बेंगळूर ब्लास्टर्सच्या सौरभ वर्माने अवध वॉरियर्सच्या वेंन्सेंट वाँग की चा 13-11, 11-7 असा पराभव केला होता. दरम्यान सामन्यात एस. अमृतपाल आणि बोडीन इस्सार तसेच सायना नेहवाल आणि एस. श्रीकांत यांनी मिश्र दुहेरीचे सामने जिंकून अवध वॉरियर्सचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अवध वॉरियर्सने 18 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून मुंबई रॉकेटस्ने 16 गुणांसह दुसरे, बेंगळूर ब्लास्टर्सने 11 गुणांसह तिसरे तर चेन्नई स्मॅशर्सने 10 गुणांसह चौथे स्थान मिळविले.

दुसऱया मिश्र दुहेरीच्या सामन्यात अवध वॉरियर्सच्या एस. अमृतपाल आणि बोडीन इस्सारा यांनी बेंगळूर ब्लास्टर्सच्या हो आणि सिक्की रेड्डी यांचा 11-9, 4-11, 11-5 असा पराभव केला. शेवटच्या पुरूष दुहेरीच्या सामन्यात बेंगळूर ब्लास्टर्सच्या सुंग को आणि सिहाँअ यांनी अवध वॉरियर्सच्या शेम गो आणि मार्कीस किडो यांचा 6-11, 11-9, 11-6 असा पराभव करून दोन महत्त्वाचे गुण मिळविले पण त्यांना ते पुरेसे नव्हते.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!