|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » क्रिडा » रायडूचे शतक, धोनी-युवीची फटकेबाजीरायडूचे शतक, धोनी-युवीची फटकेबाजी 

Mumbai: India A's Ambati Rayudu celebrates his century during a practice match against England at Brabourne stadium in Mumbai on Tuesday. PTI Photo by Mitesh Bhuvad (PTI1_10_2017_000192B)

वृत्तसंस्था/ मुंबई

ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवराज सिंग आणि शिखर धवनने धडाकेबाज अर्धशतके साजरी केली. रायडूचे संयमी शतक व धोनीने  अखेरच्या षटकात केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे भारत अ संघाने 50 षटकांत 5 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार या नात्याने धोनीचा हा अखेरचा सामना असल्याने हा सामना पाहण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

प्रारंभी, इंग्लंड इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारत अ संघाला पाचारण केले. सलामीवीर मनदीप सिंग अवघ्या 8 धावा काढून माघारी परतला. मात्र, शिखर धवन व अंबाती रायडूने दुसऱया गडय़ासाठी 121 धावांची भागीदारी साकारली. धवनने शानदार अर्धशतक साजरे करताना आगामी वनडे मालिकेसाठी आपण तयार असल्याचे दाखवून दिले. त्याने 84 चेंडूत 8 चौकार, एका षटकारासह 63 धावांचे योगदान दिले. अंबाती रायडूने शानदार शतक झळकावताना 97 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह 100 धावा केल्या. शतक झाल्यानंतर तो निवृत्त झाला.

युवी-धोनीची तडाखेबंद अर्धशतके

टीम इंडियात पुन्हा स्थान मिळालेल्या युवराज सिंगने धडाक्यात प्रारंभ करताना इंग्लंड इलेव्हनच्या गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली. युवीने 48 चेंडूत 56 धावा ठोकताना 6 चौकार व 2 षटकारांची बरसात केली. धोनीने डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करत उपस्थित पेक्षकांचे मनोरंजन केले. अंतिम षटकांत त्याने चार वेळा चेंडू सीमापार धाडत तब्बल 23 धावा कुटल्या. धोनीने झटपट अर्धशतक साजरे करताना 40 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह नाबाद 68 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला 50 षटकांत 4 गडी गमावत 304 धावापर्यंत मजल मारता आली. इंग्लंडतर्फे जॅक बेल व डेव्हिड विलीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारत अ 50 षटकांत 5 बाद 304 (मनदीप सिंग 8, अंबाती रायडू 100, शिखर धवन 63, युवराज सिंग 56, महेंद्रसिंग धोनी नाबाद 68, डेव्हिड विली 2/55, जॅक बेल 2/61).

 

कर्णधार धोनीचा अखेरचा सामना पाहण्यासाठी ब्रेबॉर्नवर प्रचंड गर्दी

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या भारत अ व इंग्लंड इलेव्हन हा सामना पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कर्णधार या नात्याने धोनीचा हा शेवटचा सामना असल्याने त्याला पाहण्यासाठी मुंबईकरांनी तब्बल दोन किमीपर्यंत रांगा लावल्या होत्या. या सराव सामन्यासाठी मोफत प्रवेश होता. पण, मोजक्याच जागांसाठी हा मोफत प्रवेश असल्याने सकाळपासून सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. धोनीनेही आपल्या चाहत्यांना निराश न करता फटकेबाजी करत नाबाद 68 धावांचे योगदान दिले. धोनीच्या प्रत्येक फटक्यासोबत स्टेडियमवर ‘़धोनी, धोनी’ असा जयघोष होत होता. आपल्या लाडक्या कर्णधाराला पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांनी हा सामना धोनीमय करुन टाकला होता. धोनीप्रमाणे युवराज सिंगने मारलेल्या फटक्यांनाही दाद देत त्याला प्रोंत्साहित केले.

धोनीचा सत्कार

10spo-07-india-a-captain-mahendra-singh-dhoni-is-felicitated-by-cricket-club-of-india-officials

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यावेळी भारत अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. सामना सुरु होण्याआधी सीसीआयच्या पदाधिकांऱयाच्या हस्ते भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचा सत्कार करण्यात आला.

Related posts: