|Monday, July 31, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सिद्धार्थ वाझे, साकिब मुल्ला ‘रिइमॅजिंग स्ट्रीट प्रोजेक्ट स्पर्धे’त प्रथमसिद्धार्थ वाझे, साकिब मुल्ला ‘रिइमॅजिंग स्ट्रीट प्रोजेक्ट स्पर्धे’त प्रथम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पुण्याच्या बिनाले फाऊंडेशनतर्फे आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रिईमॅजिंग स्ट्रीट प्रोजेक्ट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डी. वाय. पाटील आर्कीटेक्चर महाविद्यालयात दुसऱया वर्गात शिकणाऱया सिद्धार्थ वाझे व साकीब मुल्ला या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. यासाठी त्यांना रूपये 25,000 चे पारितोषिक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 सिद्धार्थ वाझे व त्याचा सहकारी साकीब मुल्ला यांनी एकत्ररित्या महालक्ष्मी मंदीर, खासबाग, मिरजकर तिकटी परिसर पुर्वी कसा होता, आता कसा आहे आणि भविष्यात कसा होऊ शकतो, याबाबतचे सादरीकरण केले. शहरात असणारे रस्ते, त्याचा उपयोग कसा होतो व कसा व्हावा, या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प होता. या स्पर्धेत देशभरातून 36 विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. 

करवीर निवासिनी अंबाबाईचे शहर आणि शाहूंची कर्मभूमी या दोन्ही वैशिष्टय़ांचा वारसा कायम राखत त्यांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने वारसा स्थळ दाखवले. तसेच वॉकथ्रु मिडीया वापरून व्हिडीओ तयार केला. सोमवारी पुण्याच्या नेहरु कल्चरल सेन्टर ऑडीटोरियममध्ये या प्रकल्पाचे अखेरचे सादरीकरण व समितीबरोबर चर्चा झाली. या समितीत  ख्रिस्तोफर बेनीगर, के. टी. रविंद्रन, नरेन्द्र डेगंळे, पी. के. दास, पी. वी. के. रामेश्वर, विद्या मोहन कुमार या अनुभवी आर्किटेक्ट तज्ञांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांनी आपले अनुभव सांगून पुणे तसेच दिल्ली, हॉगंकॉगं, पॅरीस, ईटली, फ्रान्स, जर्मनी येतील रस्ते व त्याचा कलात्मक वापर कसा केला जाते याची उत्तम माहिती दिली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!