|Tuesday, August 1, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विरोधी पक्षनेते शिराळे यांचा महापौरांच्या हस्ते कार्यालय प्रवेशविरोधी पक्षनेते शिराळे यांचा महापौरांच्या हस्ते कार्यालय प्रवेश 

कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन विरोधी पक्षनेते किरण आण्णासो शिराळे यांनी आज दि.9 त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

 यावेळी ताराराणी आघाडी पक्षाचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, महिला बालकल्याण समिती सभापती सौ.वृषाली कदम, प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, गटनेता सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नगसेवक सुनिल कदम, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, किरण नकाते, संजय मोहिते, ईश्वर परमार, संतोष गायकवाड, राजाराम गायकवाड, राजू दिडोर्ले, सुभाष बुचडे, ,आशिष ढवळे, प्रतापसिंह जाधव, नगरसेविका रुपाराणी निकम, मनिषा कुंभार, स्मिता माने, अर्चना पागर, सुनंदा मोहिते, सविता भालकर, जयश्री जाधव, गीता गुरव, सरिता मोरे, ललिता बारामते, शिराळे कुटूंबीय व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रथमच मोठया संख्येने गर्दी झाली होती.

महापौरांच्या उपस्थित प्रवेश

गेल्या वर्षभरामध्ये महापालिकेमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप-ताराराणी आघाडी असे चित्र आहे. पदाधिकाऱयांच्या कार्यालय प्रवेशावेळी हे दोन्ही आघाडीतील सदस्य कधीही एकत्र आले नाहीत. विरोधी पक्षनेते शिराळे यांच्या कार्यालय प्रवेशच महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात आल्याने महापालिकेमध्ये याची चर्चा सुरु होती.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!