|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हागणदारी मुक्त अभियानात पलूस ची आघाडीहागणदारी मुक्त अभियानात पलूस ची आघाडी 

वैभव माळी / पलूस

पलूस नगरपरिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱया हागणदारी मुक्त पलूस शहर या अभियानास नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी हे अभियान सुरू झाले असून पंधरादिवसाच्या कालावधीत 150 पैकी 90 लाभार्थ्याचे प्रस्ताव नगरपरिषदेमध्ये दाखल झाले आहे. त्यापैकी पहिल्याटप्यात 35 लाभार्थ्याच्या खात्यावर आज दोन लाख दहा हजार रूपये इतकी रक्कम वर्ग होणार आहे. जिल्हयातील इतर नगरपंचायत व नरपरिषदेच्या तुलनेत पलूस नगपरिषदेने हागणदारी मुक्त अभियानात आघाडी घेतल्याचे पुढे आले आहे.

  नवीन वर्षाच्या सुरूवातीला पलूस नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी पलूस शहर संपूर्ण हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला होता. शौचालये बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाकडून बारा हजार रूपये थेट अनुदान मिळते. नगरपरिषदेवर कॉग्रेस पक्षाचीसत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नगरसेविकांची प्रभारी मुख्याधिकारी महेश रोकडे व माहिती व तंत्रज्ञान तज्ञ सुहास चव्हाण यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पलूस शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला होता. येत्या 26 जानेवरी पर्यत पलूस शहरातील घर तिथे शौचालये करून दाखवण्याठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. नव्यानेच झालेल्या इतर नगरपंचायत, नगरपरिषदेच्या तुलनेत पलूस नगरपरिषदेचे हागणदारी मुक्त अभियानात प्रभावी काम केले आहे. शासनाकडून पहिल्या टप्यात 150 शौचालयासाठी निधी उपलब्ध केला आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नगरसेवक जोमाने कामाला लागले असल्याचे निर्दशानास आले आहे. प्रत्येक प्रभागातून प्रस्ताव येत असून आज अखेर 90 प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी 35 प्रस्ताव पात्र ठरले. उर्वरीत प्रस्तावामध्ये अपुरी कागदपत्र आढळल्याने ती पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पलूस मधील 35 लाभार्थ्याच्या खात्यावर आज बुधवारी दोन लाख 10 हजार रूपये वर्ग होणार आहेत.

ज्या कुटुब्ंाास शौचालय नाही अशा कुटुंबाने तत्वरीत नगरपालिकेशी संपर्क साधून शौचालय बांधावे, शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून बारा हजार रूपये अनुदान प्राप्त होणार आहे. लाभार्थीनी  कागदपत्रे नगरपरिषदेमध्ये जमा केल्यास लाभधारकांच्या खात्यावर थेट सहा हजार रूपये जमा होतील. त्यानंतर उर्वरीत शौचालय पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रूपये जमा होणार आहेत. त्यानंतरची रक्कम नगरपालिका चौदाव्या वित्त आयोगातून देईल. लाभार्थ्यानी रेशनकार्ड झेरॉक्स, शंभर रूपये स्टॅम्पपेपर, दोन फोटो, बँक पासबुक, जागेचा आठ अ चा उतारा इत्यादी कागपत्र दयावयाची आहेत.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!