|Wednesday, August 9, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपालाच मतदार सत्तारूढ करणार : महादेव नाईक यांना विश्वासभाजपालाच मतदार सत्तारूढ करणार : महादेव नाईक यांना विश्वास 

वार्ताहर/ बोरी

 भाजपा सरकारने राबविलेल्या योजना तळागाळातील नागरीकांपर्यत पोहोचल्याने गोव्यातील मतदार भाजपा सरकार पुन्हा एकदा गोव्यात सत्तेवर आणण्यासाठी फक्त भाजपालाच मतदान करणार आहे असा विश्वास उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी व्यक्त केला. काल दत्तगड बेतोडा येथे घेतलेल्या बैठकीला सुमारे 350 स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

यावेळी बेतोडय़ाच्या सरपंच पूनम सामंत, उपसरपंच दुर्गाप्रसाद वैद्य, पंचसदस्य चंद्रकांत सामंत, राजेंद्र नाईक, सौ. ज्य़ोती गावडे, बोरीचे जि.प. सदस्य दीपक नाईक बोरकर, शिरोडा भाजपा मडळ अध्यक्ष सुरज नाईक, पंच संजय गावडे, युवाअध्यक्ष देवराज तळावलीकर, दत्तगड बुथ अध्यक्ष शौकत अली, उपाध्यक्ष अय्यन पठाण, युवा केंद्रिय समितीचे सदस्य कपिल बोरकर, विश्वास प्रभूदेसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विश्वास प्रभूदेसाई, पूनम सामंत, शौकत अली व अय्यन पठाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागत दुर्गाप्रसाद वैद्य यांनी तर सुत्रसंचालन चंद्रकांत सामंत यांनी केले. देवराज तळावलीकर यांनी आभर मानले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!