|Wednesday, August 2, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्वाभिमान जपण्यासाठी अपक्ष उमेदवारीस्वाभिमान जपण्यासाठी अपक्ष उमेदवारी 

वार्ताहर/ माशेल

प्रियोळ मतदार संघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱया गोविंद गावडे यांनी मंगळवारी युवा मतदारांशी संवाद साधला. माशेल येथील शांतादुर्गा वेर्लेकरणी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

तुम्ही एखाद्या पार्टीतर्फे निवडणूक न लढविता स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात का उतरता या स्वप्नील अस्नोडकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्वतंत्र उमेदवार म्हणून मतदार संघात जास्त विकासकामे करता येतात. जनतेच्या विविध प्रश्नावर अपक्ष उमेदवारच योग्यपद्धतीने आवाज उठवू शकतो. पार्टीच्या आमदारांना हल्ली ते स्वातंत्र्य मिळत नाही. स्वाभिमान राखून ठेवण्यासाठी अपक्ष म्हणून लढायचे ठरविले आहे. काही आमदार सरकारमध्ये राहून सर्व सुखसोयी घेतात व सरकारमधून बाहेर पडल्यानंतर सरकारविरोधातच गरळ ओकतात, असा आरोपही त्यांनी केला.

 प्रियोळ मतदार संघातून नेमके कुठले प्रश्न प्रलंबित आहेत असे वाटते या अभिजित यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोविंद गावडे म्हणाले, प्रियोळ मतदार संघातील आमाडी-केरी गावातील ग्रामस्थांचे खडी क्रशर विरोधातील आंदोलन, मुंडकार कायदा दुरुस्ती विधेयकाला विरोध, फर्मागुडी येथे बेकायदेशीर जमिन बळकावण्याच्या प्रयत्नाला विरोध आदी आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेशी जोडला गेलो आहे. अगदी न्यायालयापर्यंत यापैकी काही प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे. राजकारणात आपल्यावर उलट सुलट आरोप होतात त्याविषयी काय सांगाल ? असे विचारले असता, आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, सरकार विरोधातात बोलत त्यामुळे हे आरोप होतात. सर्वसामान्याच्या हक्कासाठी लढताना अशा आरोपांना आपण भिक घालीत नाही असे गोविंद गावडे म्हणाले. आपण उच्च शिक्षित व अभियंते असतानाही राजकारणात का आलात ? या रोहित खांडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सर्वसामान्यांचा व युवाशक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रियोळ मतदार संघ विविध प्रकारच्या विकासासाठी आजही मागास राहिला असे वाटते का ? या प्रश्नावर बोलताना प्रियोळ मतदार संघ प्राथमिक शिक्षण, सुरळीत वीज व पाणी पुरवठा, प्रवासी वाहतूक अशा अनेक मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. सुशिक्षित युवकांसाठी रोजगारीचा प्रश्न आहे. याशिवाय शेतकरी व बागायतदारांचेही प्रश्न आहेत. कलाकारांसाठी सांस्कृतिक केंद्राची उभारणी करायची आहे. पर्यटनीय सुविधा उभारुन त्याला रोजगाराच्या प्रवाहात आणायचे आहे. निवडून आल्यानंतर या सर्व गोष्टींवर क्रमाक्रमाने भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टी करण्यासाठी विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत काय ? या प्रश्नावर विकासासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न आदी समजणे आवश्यक आहेत. शिवाय त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छशक्तीही ही आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!