|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मला केवळ पाच वर्षे संधी द्या : मोन्सेरातमला केवळ पाच वर्षे संधी द्या : मोन्सेरात 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी मतदारसंघात काल बाबुश मोन्सेरात यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला नारळ ठेऊन कौल घेतला व प्रचाराला प्रारंभ केला. पणजीत आपल्याला मतदारांनी केवळ पाच वर्षांसाठी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक घरात एक नोकरी देईन असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी पणजी मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी काल आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो व यतिन पारेख यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना मोन्सेरात यांनी भाजपवर तोफ डागली.

पणजीतील मतदारांनी मागील 25 वर्षे भाजपला पणजीत संधी दिली. या 25 वर्षात भाजपने पणजीचा कोणताच विकास केला नाही. भाजपला लोकांनी 25 वर्षे संधी दिली. आपल्याला केवळ पाच वर्षे संधी द्यावी. प्रत्येक घरात एक नोकरी देईन असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजपने पणजीत पंधरा हजार नोकऱया देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी किती नोकऱया दिल्या हे स्पष्ट करावे. आपण कुणालाही कमी मानीत नाही, पण निवडून येण्यासाठी काम करायलाच हवे असेही ते म्हणाले. निवडणुकीनंतर भाजपला सहकार्य करणार काय असे विचारले असता गोव्यात भाजप विरोधी वातावरण आहे व भाजप सत्तेवर येणार नाही असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!