|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुदिनच्या म.गो.उमेदवारीसाठी वेरेकर यांचे योगदान नव्हतेसुदिनच्या म.गो.उमेदवारीसाठी वेरेकर यांचे योगदान नव्हते 

वार्ताहर/ मडकई

माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद नागेशकर व मडकई मतदार संघातील अनेक कार्यकर्त्याच्या  प्रयत्नामुळेच 1999 साली सुदिन ढवळीकर यांना म. गो. पक्षाची उमेदवारी मिळाली होती. माजी आमदार शिवदास शेट वेरेकर यांचे त्यात कुठलेच योगदान नव्हते, हे त्यांनी ध्यानात ठेवावे अशी टिका म. गो. पक्षाचे केंद्रीय संयुक्त चिटणीस प्रताप फडते यांनी केली आहे.

म. गो. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्याना घेऊन विनोद नागेशकर म. गो. पक्षाच्या नेत्यांना भेटले होते. त्याकाळी ते म. गो. पक्षाचे खंदे समर्थक होते. 1999 साली   श्री. नागेशकर व पक्षाचे अनेक कार्यकर्ते माजी मंत्री डॉ. काशिनाथ जल्मी, माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर तसेच ऍड. रमाकांत खलप व धर्मा चोडणकर या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन म. गो. पक्षाची उमेदवारी सुदिन ढवळीकर यांना दिली होती, असेही श्री. फडते यांनी म्हटले आहे.

 शिवदास शेट वेरेकर हे म. गो. पक्षाशी आपण निष्ठावंत असल्याच्या दावा करतात. त्यांनी 2007 चा विधानसभेचा काळ आठवावा. त्यावेळी फेंडय़ात काँग्रेस  उमेदवार रवी नाईक होते. त्यांच्या समर्थनार्थ कॉग्रेस पक्षाचा प्रचार वेरेकर हे करीत होते, हे त्यांनी विसरु नये, असा आरोपही फडते यांनी केला आहे.

 शिवदास वेरेकर यांनी शिष्टाचाराला धरून बोलावे. ढवळीकर बंधूच पक्षाचे निर्णय घेतात. पक्षासंबंधीचे निर्णय फक्त केंद्रीय समीती घेते. त्यात ढवळीकर बंधू कधीच हस्तक्षेप करीत नाहीत, असेही फडते यांनी म्हटले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!