|Thursday, August 3, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पोर्तुगालचे पंतप्रधान आजपासून गोवा भेटीवरपोर्तुगालचे पंतप्रधान आजपासून गोवा भेटीवर 

प्रतिनिधी/ मडगाव

पोर्तुगालचे पंतप्रधान डॉ. आंतोनियो कॉस्ता हे आज दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. गुरूवारपर्यंत त्यांचा मुक्काम असून गुरूवारी रात्रीच ते पुन्हा पोर्तुगालकडे प्रयाण करणार आहेत. आज बुधवारी सकाळी ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चला व नंतर मंगेशी येथे श्रीमंगेश देवस्थानला भेट देणार आहेत.

डॉ. आंतोनियो कॉस्ता हे मुळचे गोव्यातील मडगावचे रहिवासी आहेत. गुरूवार दि. 12 रोजी दुपारी 12 वाजता ते आपल्या मडगावच्या मूळ घराला भेट देणार आहेत. या ठिकाणी तीन तास त्यांचा मुक्काम असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मडगावच्या आबाद फारिया रोडवर त्यांचे मूळ घर आहे.

आचार संहितेमुळे स्वागतावर मर्यादा

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता जारी झाल्याने, डॉ. कॉस्ता यांच्या स्वागताच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्या आहेत. डॉ. कॉस्ता ज्या मार्गाने आज व उद्या प्रवास करणार आहेत त्या मार्गावर काल रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे. ओल्ड गोवा व मंगेशीला भेट देण्याच्या काळात फोंडा-पणजी मार्गावरील वाहतूक थोडय़ावेळासाठी नियंत्रित केली जाणार आहे. अवजड वाहने रोखून धरली जातील.

उद्या मूळ घरी जाणार

गुरूवारी मडगाव भेटीच्या दरम्यान दुपारचे जेवण ते मूळ घरी घेतील. नंतर थोडी विश्रांती घेतील. त्यांच्या घराजवळ मडगाव पालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली आहे. हे जुने घर एका बडय़ा व्यक्तीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. काल सकाळी जेव्हा रंगीत तालीम घेण्यात आली, तेव्हाच त्याचा प्रत्यय आला.

डॉ. आंतोनियो कॉस्ता यांच्या मूळ घरात सध्या त्यांची चुलत बहीण ऍना करिना कॉस्ता या आपल्या कुटुंबियांसहीत राहत आहेत. त्याच डॉ. कॉस्ता यांच्या जेवण्याची व्यवस्था पाहणार आहेत. या दिवशी डॉ. कॉस्ता वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीला तसेच गोव्यातील काही पोर्तुगीज संस्थांना देखील भेटी देणार आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!