|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » श्रेयवादावरुन नगरसेवकांमध्ये चकमक

श्रेयवादावरुन नगरसेवकांमध्ये चकमक 

प्रतिनिधी/ सातारा

शहर पोलीस ठाण्याच्या नजिकच्या रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाच्या ठिकाणीच हे काम कोणी केले. त्यावरुन नविआचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे व त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे, शहराध्यक्ष सुनील काळेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांची रस्त्यावरच चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. या सुरु झालेल्या शाब्दीक वादामुळे अभियंता मोहिते यांची मात्र तारांबळ उडाली होती. त्यांनी लगेच तेथून पळ काढला. त्यानंतर हा वाद शमला.

पोलीस ठाणे ते नगरपालिका या दरम्यानचे रस्त्याचे काम सुरु आहे. यावरुन श्रेयवाद रंगू लागला आहे. नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे हे व त्यांचे कार्यकर्ते तेथे होते. अभियंता मोहिते हेही तेथे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. याची माहिती भाजपाच्या नगरसेवक विजय काटवटे, शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना मिळाली.

त्यामुळे बातमी मिळताच तेही तेथे पोहचले. त्यांनी हे काम आमचे नेते बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यामुळेच झाले आहे. त्यामुळे तुम्ही उगाच श्रेयवाद लाटू नये. तुम्ही मनोमीलनाच्या काळात का कामे केली नाहीत,  असा सवाल यावेळी व्यक्त केला. त्यामुळे शब्दाने शब्द वाढततच चालला.

बघ्यांची मात्र चांगलीच करमणूक

एका कार्यकर्त्याने आक्रमकपणाने बोलत बाळासाहेब खंदारेंना या आधी काम का केले नाही? असा प्रश्न विचारला. त्यामुळे बाळासाहेबही आक्रमकपणाने बोलत दोन वर्षात का कामे झाली नाहीत, असा सवाल केला. या शाब्दीक चकमकीमध्ये मात्र अभियंता मोहिते यांनी मात्र तेथून पोबारा केला. बघ्यांची मात्र चांगलीच करमणूक झाली.

Related posts: