|Saturday, July 29, 2017
You are here: Home » leadingnews » दहा महापालिका निवडणुकांचा बिगुल आज वाजणारदहा महापालिका निवडणुकांचा बिगुल आज वाजणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेले मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणूकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून त्यात महापलिकांसह राज्यातील 26 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणुकांचे वेळापत्र जाहीर होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला भरभरून मत देणाऱया शहरी मतदारांच्या मनात काय आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. गेली अडीच वर्षे राज्याचे सत्ताशकट हाकणाऱया फडणवीस सरकारची कसोटी पाहणारी ही निवडणूक असून मित्रपक्ष शिवसेनेलाही आपले प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप – सेना युती करणर की दोन्ही पक्ष एकला चलोची भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवेल .

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!