|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » Top News » सातव्या वेतन आयोगासाठी शासकीय आधिकारी संपावरसातव्या वेतन आयोगासाठी शासकीय आधिकारी संपावर 

800x480_image62467044

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शासकीय आधिकारी आणि कर्मचाऱयांनी 18 ते 20 जानेवारी दयम्यान संपावर जाणार आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी हा संपाच इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध खात्यातील 1 लाख 20 हजार राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा, निवृतीच वय 60 वर्ष करावं, तसंच महिला अधिकारांना दोन वर्षाची बालसंगोपन राजा मिळावी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठकीत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली.

 

Related posts: