|Sunday, January 21, 2018
You are here: Home » leadingnews » जि.प., मनपा निवडणुकांचा बिगुल; 16 व 21 फेब्रुवारीला मतदान

जि.प., मनपा निवडणुकांचा बिगुल; 16 व 21 फेब्रुवारीला मतदान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात होणाऱया जिल्हा परिषदांच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तर दुसऱया टप्प्यात 10 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याकरिता 16 व 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मनपा निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत असून, सर्व निकाल 23 फेबुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. सहारिया यांना दिली.

vote

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सहारिया यांनी ही माहिती दिली. राज्यातील 25 जिल्हा परिषदांपैकी पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे आणि 162 पंचायत समितींसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याचबरोबर दुसऱया टप्प्यात 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

vote

10 महापालिकांसाठीही येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या सर्व निवडणुकांचा निकाल 23 फेब्रुवारीला लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आचारसंहिता आजपासून लागू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: