|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » Top News » मी पंजाबचा मुख्यमंत्री होणार नाही : केजरीवालमी पंजाबचा मुख्यमंत्री होणार नाही : केजरीवाल 

kejriwal

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी असताना पंजाबचा मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, पंजाबचा मुख्यमंत्री हा याच भूमीतील असेल, असे म्हणत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या शक्यतेला पूर्णविराम दिला.

पटियाला येथील प्रचारसभेत बोलताना केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पंजाबमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर केजरीवाल यांनी स्पष्टपणे नकार दिला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज केजरीवाल यांनी मी पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts: