|Wednesday, August 2, 2017
You are here: Home » उद्योग » नोटाबंदीचा कृषी क्षेत्रावर विपरित परिणाम नाहीनोटाबंदीचा कृषी क्षेत्रावर विपरित परिणाम नाही 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा रबी पेरणी आणि तांदूळ, सोयाबीन आणि मका यासारख्या महत्त्वाच्या खाद्यान्नाच्या किमतीवर कोणताही वाईट परिणाम झाला नाही, असे नीति आयोगाचे सदस्य समेश चंद यांनी म्हटले.

देशात पिकांची किती प्रमाणात पेरणी करण्यात आली याची माहिती कृषी मंत्रालयाकडून दर आठवडय़ाला प्रसिद्ध केली जाते. 11 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.6 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रबी पेरणी करण्यात आली होती. सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 5.7 टक्के ही पेरणी कमी होती. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यापासून या हंगामात पेरणी क्षेत्र आणि सरासरी क्षेत्रात अंतर निर्माण झाले. 30 डिसेंबर 2016 च्या शेवटच्या आठवडय़ात सरासरी भागात 2.77 टक्के आणि पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.86 टक्क्यांनी वाढ झाली. सरासरी रबी पेरणी 30 डिसेंबरपर्यंत 88 टक्के झाली होती. यंदा ती 91 टक्क्यांपेक्षा जास्त झाली, असे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने नोव्हेंबरमध्ये त्याचा कोणताही परिणाम भात, सोयाबीन आणि मका यासारख्या प्रमुख पिकाच्या किमतीत झालेला नाही. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये एपीएमसी मंडीतील घाऊक किमती या 3 टक्के अधिक होत्या. मात्र सरकारी अहवालानुसार शेतकऱयांच्या उत्पन्नात घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!