|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » जीएसटी 1 एप्रिलपासून लागू होईल : अर्थमंत्री जेटलीजीएसटी 1 एप्रिलपासून लागू होईल : अर्थमंत्री जेटली 

वृत्तसंस्था/ गांधीनगर

प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधातील प्रलंबित मुद्दे लवकरात लवकर सोडविता आले, तर केंद्र सरकार या प्रणालीला 1 एप्रिलपासून लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. जीएसटी लागू करण्यासाठी जास्तीत जास्त 16 डिसेंबर 2017 पर्यंत मुदत आहे. या नव्या कर प्रणालीने केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडील सध्याचे जास्त कर समाप्त होणार आहेत. या करांमध्ये केंद्रीय अकबारी कर, सेवा कर आणि राज्यांचा व्हॅट आणि विक्री कर यांचा सहभाग आहे. पुढील काही आठवडय़ांमध्ये जीएसटीवरील नियंत्रण आणि सशक्तीकरण यासारख्या मुद्यांवरील समाधान काढण्यास यश मिळेल असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

जीएसटी लागू करण्यासाठी संसदेत विधेयक संमत करण्यात आले. जीएसटी लागू करण्यासाठी संसदेमध्ये संमत करण्यात आलेले आणि राज्यांनी अनुमोदन दिलेल्या विधेयकाची मुदत 16 डिसेंबरनंतर समाप्त होईल. सरकार विक्रीवर नवीन कर व्यवस्था 1 एप्रिलपासून लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकाच प्रकारची कर व्यवस्था होणार असून जगातील सर्वात मोठी एकत्रित बाजारपेठ असा भारताचा उदय होणार आहे. जीएसटीने व्यावसायिकांना कर देणे सोपे जाईल. यामुळे करचोरी रोखण्यास सरकारला मदत होईल आणि सरकाराचा महसूल वाढेल. जीएसटीने राज्यांना होणाऱया महसूलातील नुकसानीबद्दल काही मतभेद आहे. जीएसटीची आगामी बैठक 16 जानेवारीला होणार आहे, असे जेटली यांनी सांगितले.

जीएसटीने उद्योगांचे

ओझे कमी होणार…

जीएसटीने कर व्यवस्था सरळ आणि सुलभ होणार आहे. संपूर्ण देशात एकाच कर असल्याने तो देण्यासाठी पेडिट अथवा डेबिट कार्डचाही वापर करता येईल. व्यापारी आणि उद्योजक यांना हा कर देणे सोपे होणार आहे आणि त्यांच्यावरील सध्याचे कराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. यामुळे सध्याचे लहान-लहान कर बंद होतील, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!