|Sunday, July 30, 2017
You are here: Home » उद्योग » तेजीने बाजार दोन महिन्यांच्या उच्चांकावरतेजीने बाजार दोन महिन्यांच्या उच्चांकावर 

बीएसईचा सेन्सेक्स 241, एनएसईचा निफ्टी 92 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

बुधवारी भांडवली बाजारात दमदार तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये साधारण 1 टक्क्यांनी तेजी आली, तर सेन्सेक्स 0.9 टक्क्यांनी वधारला. बाजारात खरेदी झाल्याने निफ्टी 8,389 आणि सेन्सेक्सने 27,175 पर्यंत मजल मारली होती.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 241 अंशाने वधारत 27,140 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 92 अंशाने वधारत 8,381 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीच्या मिडकॅप 100 निर्देशांकात 1.2 टक्क्यांनी तेजी आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

मेटल, ऑटो, बँकिंग, फार्मा, कॅपिटल गुड्स आणि पॉवर समभागात सर्वात जास्त खरेदी झाली. बँक निफ्टी 2.3 टक्क्यांनी वाढत 18,830 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2.3 टक्के आणि खासगी बँक निर्देशांक 2.4 टक्क्यांनी मजबूत झाला.

निफ्टीचा मेटल निर्देशांक 4.3 टक्के, फार्मा निर्देशांक 1 टक्के आणि ऑटो निर्देशांकात 0.9 टक्क्यांनी वाढ झाली. बीएसईचा कॅपिटल गुड्स निर्देशांक 1.4 टक्के आणि पॉवर निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी आली होती. मात्र आयटी समभागात काही प्रमाणात विक्री दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

हिंडाल्को, इन्डसइन्ड बँक, कोल इंडिया, बँक ऑफ इंडिया, यस बँक, टाटा स्टील, ल्यूपिन, एल ऍन्ड टी आणि आयसीआयसीआय बँक 6.4-1.8 टक्क्यांनी वधारत बंद झाले. बजाज ऑटो 1.1 टक्के, आयटीसी 0.6 टक्के, एचसीएल टेक 0.6 टक्के, ओएनजीसी 0.4 टक्के, रिलायन्स इन्डस्ट्रीज 0.4 टक्के आणि इन्फोसिस 0.15 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

मिडकॅप समभागात जिंदाल स्टील, 3एम इंडिया, यूनियन बँक, नाल्को आणि इंडियन बँक 9.4-5.7 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात सुप्रीम इन्फ्रा, उषा मार्टिन, जय भारत मारुती, हिमतसिंगका सीड आणि आयएफजीएल रिफॅक्टरी 20-11.8 टक्क्यांनी वधारले.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!