|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणूक कार्यासाठी जुंपू नका !निवडणूक कार्यासाठी जुंपू नका ! 

बँक कर्मचाऱयांचे आयोगाला आवाहन : नोटाबंदीनंतर कामाचा ताण वाढल्याचा दावा

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

 बँक कर्मचाऱयांची संघटना नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सने नोटाबंदीनंतर बँक कर्मचाऱयांवर दबाव वाढल्याचा हवाला देत निवडणूक आयोग आणि अर्थमंत्रालयाकडे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीही जबाबदारी टाकू नका असे आवाहन केले आहे. भारतीय मजदूर संघाशी संबंधित या संघटनेने मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांना पाठविलेल्या पत्रात बँक कर्मचाऱयांना निवडणूक कार्यापासून वेगळे ठेवले जावे असे म्हटले.

बँक कर्मचाऱयांनी नोटाबंदी दरम्यान मागील 50 दिवस 12 ते 18 तास काम केले आहे. अजूनही कर्मचारी प्रलंबित काम संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. ते जुन्या नोटांचा तपशील तयार करत आहेत. त्यांना नोटाबंदी आणि आर्थिक वर्षाच्या समाप्तीसहित अनेक कामे पूर्ण करावयाची आहेत, यामुळे निवडणुकीच्या कामासाठी त्यांना नियुक्त केले जाऊ नये असे पत्रात नमूद करण्यात आले.

संघटनेचे उपाध्यक्ष अश्विनी राणा यांनी अर्थमंत्रालयाकडे अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले. बँक कर्मचाऱयांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले तर बँकेचे कामकाज प्रभावित होईल. कर्मचारी देखील मोठय़ा तणावाखाली येतील असा दावा त्यांनी केला. 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याच्या घोषणेनंतर शाखांवर जुन्या नोटा बदलणे आणि जमा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. जुन्या नोटा जमा करण्याची मुदत 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आली
आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!