|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तालिबान संघटनेसाठी अफगाणची गुप्त योजनातालिबान संघटनेसाठी अफगाणची गुप्त योजना 

काबुल

 तालिबानी हल्लेखोरांना पाकिस्तानच्या प्रभावापासून दूर राखण्यासाठी अफगाणिस्तान एका धोरणावर काम करत आहे. प्रत्यक्षात अफगाणचे हे धोरण आपल्या देशात तालिबानी दहशतवाद्यांशी वाढता संघर्ष रोखण्यासाठी असेल. अफगाणचे अधिकारी तालिबानी हल्लेखोरांसाठी एक ‘सुरक्षित क्षेत्र’ बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणची ही योजना देशात मागील 15 वर्षांपासून सुरू असलेले बंड रोखण्याच्या रणनीतिचा हिस्सा मानले जात आहे. तालिबानच्या  हल्लेखोरांशी शांतता प्रयत्न सातत्याने अपयशी ठरल्याने अमेरिकेचे समर्थनप्राप्त लष्कराला या बंडापासून मोठे नुकसान झेलावे लागले आहे. जर अफगाणच्या योजनेनुसार तालिबानचा पाकचा प्रभाव कमी झाला, तर देशाच्या शांततेसाठी हे उपयुक्त ठरू
शकते. परंतु याचे चांगले तसेच वाईट दोन्ही परिणाम समोर येऊ शकतात. कंदहारचे पोलीस प्रमुख अब्दुल रज्जाक यांनी मागील महिन्यात एका संमेलनात तालिबानला अफगाणमध्ये परतण्याचे आवाहन करत त्याच्यासाठी एक सुरक्षित क्षेत्र बनविण्याची गरज अधोरेखित केली होती.

सरकारचे मुख्य लक्ष्य तालिबानला पाकिस्तानच्या कळपातून बाहेर काढणे आहे. तालिबानचे हल्लेखोर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरता वेगळे क्षेत्र बनविले जाईल. यानंतर संघर्ष करावा किंवा शांतता राखावी याचा निर्णय ते घेऊ शकतात. पाकिस्तानच्या दबावातून मुक्त होण्याचा फायदा यामुळे तालिबानला होणार असल्याचे एका वरिष्ठ अफगाण अधिकाऱयाने सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!