|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तैवान-चीन यांच्यातील तणावात पुन्हा वाढतैवान-चीन यांच्यातील तणावात पुन्हा वाढ 

तैवानी स्ट्रेटमध्ये शिरली चिनी युद्धनौका : राष्ट्राध्यक्षा वेन यांच्या अमेरिका दौऱयाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था / तैपैई

 चीन आणि तैवान दरम्यान पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. चिनी युद्धनौकांच्या एका गटाने बुधवारी तैवान स्ट्रेटमध्ये प्रवेश केला, ज्यानंतर तैवानचे नौदल आणि लढाऊ विमान देखील चीनसमोर आले.

चिनी विमानवाहू नौका लायोनिंग तैवानच्या जलक्षेत्रात शिरली नाही, परंतु अशा क्षेत्रात आले, जे तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रांतर्गत येते असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. चीनच्या या कृत्याला त्याचे शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. यानंतर लढाऊ विमान आणि नौदलाच्या नौका स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे तैनात करण्यात आल्या असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते चेन चुंग-छी यांनी म्हटले.

तैवानी लष्कराने चीनच्या विमानवाहू युद्धनौकेवर नजर ठेवण्यासाठी एफ-16 लढाऊ विमान आणि इतर विमानांना रवाना केले. लष्कर पूर्ण स्थितीवर नजर ठेवून असून गरज भासल्यास कोणतेही पाऊल उचलले जाईल असे म्हटले गेले.

चीनच्या विरोधानंतरही तैवानच्या राष्ट्राध्यक्षा साई इंग वेन यांनी मागील आठवडय़ात अमेरिकेचा दौरा केला होता. चीन तैवानला आपला हिस्सा मानत आला आहे. साई आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मागील महिन्यात झालेल्या चर्चेमुळे बिथरलेल्या चीनने लष्करी हालचाली वाढविल्या आहेत.

तैवानला स्वतःच्या स्तरावर कोणत्याही देशाशी चर्चा करण्याचा अधिकार नाही, कारण तो आपला भाग आहे असे चीनचे मानणे आहे. चीनने मागील वर्षी जूनपासून तैपैईशी अधिकृत रुपाने चर्चा बंद केली होती. तैवानच्या वरिष्ठ संरक्षण धोरणकर्त्यांनी बुधवारी बीजिंगला पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. आमच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा करण्याची पुरेशी क्षमता आहे. अमेरिका आणि तैवानदरम्यान अधिकृत संबंध नाहीत, परंतु अमेरिका तैवानचा सर्वात शक्तिशाली सहकारी आणि शस्त्रास्त्रांचा मुख्य पुरवठादार असल्याचे तैवानच्या एका मंत्र्याने सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!