|Saturday, July 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाक सीमेवर सुरक्षा वाढविणार चीनपाक सीमेवर सुरक्षा वाढविणार चीन 

दहशतवाद रोखण्याचा मुद्दा : पाकिस्तानचे अपयश

बीजिंग : दहशतवाद्यांना आपल्या क्षेत्रात घुसण्यापासून रोखण्यासाठी चीन पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा आणखीन वाढविणार आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखणे आणि 2017 मध्ये बेकायदेशीर मार्गाने सीमा पार करणाऱयांवर कारवाईसाठी सरकार हे पाऊल उचलणार असल्याचे चीनच्या वृत्तसंस्थेने म्हटले. पाकिस्तानद्वारे दहशतवादावर अंकुश लावण्यास अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर चीन हे पाऊल उचलत आहे. कम्युनिस्ट पार्टीने चीन आणि पाकिस्तानदरम्यान वाढते संबंध पाहता सरकारचे लक्ष पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडे वेधले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेणारे सीमा पार करून चीनमध्ये घुसून आपले कट अंमलात आणू शकतात अशी भीती पक्षाला आहे.

रविवारीच शिजियांगच्या होतांग येथे पोलिसांद्वारे टाकण्यात आलेल्या छाप्यात 3 दहशतवादी मारले गेले होते. या घटनेची या भीतीला पार्श्वभूमी आहे. हे दहशतवादी डिसेंबरमध्ये झालेल्या एका हल्ल्यात सामील होते, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता.

मागील काही दिवसात चीन आणि पाकच्या विदेश मंत्र्यांदरम्यान झालेल्या चर्चेत दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्याबरोबरच दहशतवादावर नियंत्रण मिळविण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!