|Sunday, May 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी हेमामालिनींनी रोखले चित्रिकरणउत्तरप्रदेश निवडणुकीसाठी हेमामालिनींनी रोखले चित्रिकरण 

hemamalini

मथुरा

 उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराकरता बॉलिवूडची ‘ड्रीमगर्ल’ आणि मथुराच्या खासदार हेमामालिनी यांनी आपले चित्रिकरण स्थगित केले आहे. हेमामालिनी या भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. प्रचारासाठी त्यांनी चित्रिकरण आणि विदेश दौरे देखील रोखले आहेत. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची स्थिती मजबूत बनविण्यासाठी हेमामालिनी काम करतील. त्या उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करू शकतात अशी माहिती त्यांचे मथुरातील स्थानिक प्रतिनिधी जनार्दन शर्मा यांनी दिली. हेमामालिनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मथुराहून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी हेमामालिनी 13 आणि 14 जानेवारी रोजी मथुरा येथे शेतकरी आणि व्यापाऱयांच्या संमेलनाचे अध्यक्षत्व करतील. याशिवाय त्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजप उत्तरप्रदेशात आपले राजकीय गतवैभव परत मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.

Related posts: