|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुख्यमंत्री बादल यांच्यावर बूटफेकमुख्यमंत्री बादल यांच्यावर बूटफेक 

वृत्तसंस्था/ भटिंडा (पंजाब)

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या फूटफेक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याच लंबी या मतदार संघातील रत्ताखेडा या गावात ही घटना घडली. बूट थेट त्यांच्या चष्म्यावरच आदळल्याने चष्मा तुटून पडला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने त्या तरूणाला ताब्यात घेतले आहे. प्रकाशसिंग यांच्या अंगरक्षकाने बूट अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बूट बादल यांच्या चेहऱयावर पडला.

तर उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या काफिल्यावरही रविवारीच दगडफेक झाल्याची घटना घडली होती. याही घटनेनंतर राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांमुळे वातावरण ढवळून निघाले होते. आता पुन्हा अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने बादल यांच्याविरोधातील नाराजी दिसून येत आहे काय ? या चर्चेला उत आला आहे.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सध्या पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपची सत्ता आहे. प्रचाराच्या उद्देशाने गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे त्यांच्या लंबी या मतदार संघाच्या दौऱयावर आहे. रत्ताखेडा येथे त्यांची सभा सुरू होती. या सभेतच गुरूबचनसिंग व्यासपिठासमोर तिसऱयाच रांगेत बसला होता. त्यामुळेच त्याने फेकलेला बूट थेट बादल यांच्यावर येऊन पडला. स्वतःच्याच मतदार संघामध्ये त्यांच्यावर झालेली दगडफेक म्हणजे त्यांच्या कारभाराविरोधात नाराजी असल्याचा हा पुरावा असल्याचे आप व काँग्रेसने म्हटले आहे. तथापि त्या युवकाची काय नाराजी आहे ? याबाबत आम्ही गंभिरतेने दखल घेतल्याचे बादल यांच्यावतीने सांगण्यात आले.

बूटफेक करणाऱया तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरूबचनसिंग असे त्याचे नाव आहे. या तरूणाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, गुरू ग्रंथसाहिबच्या अवमान प्रकरणात सरकारने कोणाही विरोधात कडक कारवाई केली नाही की कोणाला शिक्षा केली नाही. त्यामुळे निराशेतून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. गुरूबचनसिंह हा सरबत खालसाद्वारा तख्त केसगढ साहिबचे जत्थेदार अमरिकसिंह अजनाला यांचा भाऊ असल्याचे सांगण्यात आले. बुधवारीच तो गावाकडे परतला होता. तसेच त्याचे कट्टरपंथियांबरोबर संबंध होते. सध्या तो राजनाथमधील झुरडखेडा गावात राहात आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!