|Tuesday, August 1, 2017
You are here: Home » क्रिडा » माहीपेक्षा विराट अधिक आक्रमकमाहीपेक्षा विराट अधिक आक्रमक 

रवीचंद्रन अश्वीनचे मत, भारतीय संघाचा कसून सराव

पुणे / प्रतिनिधी

महेंद्रसिंह धोनी हा यष्टीरक्षक असल्याने त्याला संघामध्ये सन्मवय राखणे सोपे गेले. माही कुल कर्णधार होता. मात्र, विराट कोहली हा त्यामनाने ऍग्रसिव्ह आहे. त्यामुळे तो माहीपेक्षा वेगळा आहे, असे मत भारतीय संघाचा हुकमी एक्का व फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्वीन याने बुधवारी येथे व्यक्त केले.

येत्या 15 जानेवारीला भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या आधी आज भारतीय संघाने कसून सराव केला. त्या वेळी तो पत्रकारांशी बोलत होता.

धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मौदानात उतरणार आहे. याबाबत विचारले असता अश्वीन म्हणाला, धोनी आणि विराट दोघे वेगळ्या स्वभावाचे आहेत. त्यांची कम्युनिकेशन स्टाईल पण वेगळी आहे. धोनी यष्टीरक्षक असल्याने सर्व संघावर त्याचा चांगला होल्ड होता. तसेच गोलंदाजीच्या वेळीदेखील माझ्यात आणि त्याच्यात कम्युनिकेशन होते. पण, विराट मात्र ऍगेसिव्ह आणि ऍटॅकिंग आहे.

इंग्लंडचा एकदिवसीय संघ पण चांगला आहे. आम्ही त्यांचा कसोटीमध्ये पराभव केला असला, तरी पांढऱया आणि लाल चेंडूवर खेळणे हा वेगळा भाग आहे.  वनडेत नवीन चेंडूवर गोलंदाजी करणे अवघड असते. मागील वर्ष माझ्यासाठी चांगले असले, तरी आता नवीन वर्षात मी प्रेश सुरूवात करणार आहे, असेही त्याने नमूद केले.

भारतीय संघाचा कसून सराव

या वेळी विराट, धोनी, युवराज, के. राहुल, शिखर धवन, जडेजासह सर्व संघाने प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या उपस्थितीत कसून सराव केला. येत्या 15 जानेवारीला भारत व इंग्लंड यांच्यात होणाऱया सामन्याच्या पार्श्वभूमीवर सराव सामन्यात विराट व धोनीवर सर्वांच्या नजरा होत्या.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!