|Friday, July 28, 2017
You are here: Home » क्रिडा » चेन्नई स्मॅशर्स उपांत्य फेरीतचेन्नई स्मॅशर्स उपांत्य फेरीत 

प्रिमियर बॅडमिंटन लीग : मुंबई रॉकेट्सवर 4-3 ने एकतर्फी मात

वृत्तसंस्था/ बेंगळूर

मिश्र दुहेरीची जोडी ख्रिस व गॅब्रिएला ऍडॉक आणि टॉमी सुगियार्तो यांनी महत्त्वाच्या सामन्यात चमकदार कामगिरी केल्यामुळे चेन्नई स्मॅशर्सने प्रिमियर बॅडमिंटन लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना मुंबई रॉकेट्सचा 4-3 असा पराभव केला.

चेन्नई स्मॅशर्सचे सध्या 14 गुण असून ते तिसऱया स्थानावर असले तरी लीग टप्पा संपल्यानंतर त्यांना दुसरे स्थान मिळविण्याची संधी आहे. ऍडॉक दाम्पत्याने ट्रम्प सामन्यात मुंबईच्या चिराग शेट्टी-नादिएदा झीबा यांचा 9-11, 11-2, 11-7 असा तर टॉमी सुगियार्तोने मुंबईच्या अजय जयरामचा 8-11, 11-2, 11-5 असा पराभव केला. पहिला गेम गमविल्यानंतर चेन्नईच्या जोडप्याने जोरदार मुसंडी मारत नंतरचे दोन गेम आरामात जिंकले. सुगियार्तोनेही जयरामविरुद्ध पहिला गेम गमविला. पण नंतरचे दोन गेम्स सहज जिंकत चेन्नईची उपांत्य फेरी निश्चित केली.

एचएस प्रणॉयने मुंबईला शानदार सुरुवात करून देत पहिला सामना जिंकला. त्याने पी. कश्यपचा 11-9, 13-11 असा पराभव केला. विशेष म्हणजे प्रणॉय या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमविलेला नाही. दोघांनी दोन्ही गेममध्ये तोडीस तोड खेळ केला. पण महत्त्वाच्या क्षणी कश्यपकडून चुका झाल्याने त्याचा लाभ उठवित प्रणॉयने विजय मिळविला. दुहेरीच्या ट्रम्प सामन्यात मुंबईने विजय मिळविल्यानंतर पाचव्या सामन्यात पीव्ही सिंधूने मुंबईच्या सुंग जि हय़ुनवर 11-8, 12-10 असा विजय मिळविला. मुंबई रॉकेट्सने याआधीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!