|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » क्रिडा » कर्णधारपदाचे ओझे वाटत नाहीकर्णधारपदाचे ओझे वाटत नाही 

virat-dhoni3

पुणे / प्रतिनिधी

एकदिवसीय आणि टी-ट्वेंटीचे कर्णधारपद मिळाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. कर्णधारपदाचे कुठल्याही प्रकारचे ओझे वा आश्चर्य वाटत नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी येथे व्यक्त केले. एका कार्यक्रमानिमित्त विराट पुण्यात आला होता. त्यानंतर अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधारपद आल्यावर काय वाटले, असा प्रश्न विचारला असता कोहली म्हणाला, कर्णधारपद मिळाल्याने आश्चर्य वाटत नाही. माझा माझ्या खेळावर पूर्णपणे विश्वास आहे. मला मिळालेला संघ चांगला आहे. संघात वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यांचे वेळोवेळी सल्ले घेत राहणार आहे. ज्युनियर संघाचे कर्णधारपद मी भूषविलेले आहे. पण, भारतीय संघाचे कर्णधारपद ही मोठी गोष्ट आहे. मात्र, मिळालेल्या जबाबदारीचे सोने करीन. 2019 पर्यंतच्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून राहिलो, तर ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची संधी असणार आहे.

भारतीय संघात आलो, तेव्हा मी संधीच्या शोधात होतो. भारतीय संघ कसा जिंकेल, याचा विचार करायचो. माझ्यातील बलस्थाने आणि उणिवा यांची मला जाणीव आहे. त्यामुळे कुठे काय करायचे हे मला कळते. तुला कोणी सल्ला दिला का, आणि तू नवीन येणाऱयांना काय सल्ला देशील, असे विचारले असता सचिन तेंडुलकर माझा आदर्श आहे. त्याने मला सांगितल्याप्रमाणे नव्याने संघात सामील झालेल्यांना मी सांगेन, तुम्ही कुठल्या एकाला अनुसरून खेळ करू नका. संघात नव्याने येणाऱयांनी भरपूर मेहनत घ्यावी.

पुण्यात खेळायला आवडते

भारतात मला पुण्यात खेळायला आवडते. पुण्यातील स्टेडियम हे माझ्या आवडीचे आहे. स्टेडियमही चांगले ठेवले आहे, असेही कोहली याने नमूद केले. 2011 च्या विश्वकपमधील सदस्य असणे आणि कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा नंबर एकवर येणे,  हे क्रिकेटविश्वातील आपल्यासाठी दोन संस्मरणीय क्षण आहेत. त्याचबरोबर मुंबई कसोटीमध्ये द्विशतक करणे व मोहाली येथे टी-ट्वेंटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेली खेळीही माझ्यासाठी खास आहे, असेही कोहलीने सांगितले.

 

Related posts: