|Sunday, July 30, 2017
You are here: Home » क्रिडा » पेस-आंद्रे सा उपांत्यपूर्व, सानिया-स्ट्रायकोव्हा उपांत्य फेरीतपेस-आंद्रे सा उपांत्यपूर्व, सानिया-स्ट्रायकोव्हा उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ ऑकलंड

लियांडर पेस व त्याचा नवा साथीदार आंदे सा यांनी येथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित ट्रीट हय़ुइ व मॅक्स मिर्नयी यांना पराभवाचा धक्का देत पहिला विजय नोंदवला.

बिगरमानांकित पेस-सा यांनी ट्रीट-मिर्नयी यांच्यावर 7-6 (7-3), 6-3 असे चकित करून दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पेस-सा यांनी चेन्नई ओपनमध्ये पुरव राजा-दिविज शरण यांच्याकडून पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारला होता. त्यांची पुढील लढत वाईल्डकार्ड प्रवेशधारक मार्कुस डॅनील-मार्सेलो डेलोलिनर यांच्याशी होणार आहे.

दरम्यान, डब्ल्यूटीए आपिया इंटरनॅशनल स्पर्धेत अग्रमानांकित सानिया मिर्झा-बार्बरा स्ट्रायकोव्हा यांनी महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी वाईल्डकार्डधारक मॅडिसन ब्रेंगल-ऍरिना रोडिओनोव्हा यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!