|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रवळनाथ गृहतारणची महिलांसाठी नवी गृहकर्ज योजनारवळनाथ गृहतारणची महिलांसाठी नवी गृहकर्ज योजना 

प्रतिनिधी/ आजरा

येथील रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्यावतीने महिलांसाठी नवी गृहकर्ज योजना सुरू केली असून कर्जाच्या व्याजदरात पाव टक्का कपात करण्यात आली आहे. यामुळे महिलांना 10.25 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.

या योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून करण्यात आली आहे. यामुळे सध्या गृहकर्ज घेणाऱया महिलांना 10.25 टक्के दराने तर प्लॉट खरेदीसाठी 11.25 टक्के दराने 75 लाखांपर्यंत कर्जमर्यादा आहे. घरबांधणी कर्ज परतफेडीच्या व्याज व मुद्दलास आयकरात सवलत असून पतसंस्था व बँकांकडील कर्ज हस्तांतरणाची सुविधादेखील उपलब्ध आहे.

नवीन घरबांधणी व प्लॉटखरेदीबरोबरच जुन्या घराच्या दुरूस्तीसाठीदेखील कर्ज देण्याची सुविधा संस्थेने उपलब्ध केली आहे. कर्जाच्या व्याजदरातील सवलतीचा अधिकाधिक महिला सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन चौगुले यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, व्यवस्थापक शिवानंद घुगरे तसेच संचालक व सल्लागार उपस्थित होते.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!