|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मलकापूरचे कृषी प्रदर्शन शेतकऱयांसाठी प्रेरणादायी

मलकापूरचे कृषी प्रदर्शन शेतकऱयांसाठी प्रेरणादायी 

प्रतिनिधी/ शाहूवाडी

मलकापूर येथील कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना उपलब्ध असल्याने ते प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी केले. मलकापूर येथील शिवाजी स्टेडियमवर (कै.) महादेवरावजी मारूती पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ महादेव फाऊंडेशन, साळशी यांच्यावतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वागत संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.

ते म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शनाचा लाभ होत आहे. विविध बाबींचे ज्ञान आणि अनुभव हादेखील महत्त्वाचा ठरत आहे.

संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसोबतच सर्वांनाच हे प्रदर्शन मार्गदर्शक व माहिती देणारे ठरणार आहे. प्रदर्शनात शेती औजारे, मार्केटिंग, व्यवस्थापन, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, दुग्ध उत्पादन, महिलांसाठी गृहपयोगी वस्तुंचे दालन आदींसह विविध स्टॉल या ठिकाणी उभारले आहेत.

यावेळी माजी उपसभापती महादेव पाटील, बांबवडेचे सरपंच विष्णू यादव, चरणचे माजी सरपंच के. एन. लाड, अजितसिंह काटकर, नामदेव गिरी, दत्तात्रय यादव, तानाजी मगदूम, संदीप पाटील, बाबासा पाटील, महेश खुटाळे, उत्तम बंडगर, तुकाराम पाटील, बाबासाल नावगे, केसरे आदी उपस्थित होते.

Related posts: