|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य

ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शहरी भागाच्या विकासा बरोबर ग्रामीण भागाच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत असून रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा डोंगरी वाडय़ावस्त्यांवर पोहचवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. असे प्रतिपाद खासदार धनंजय महाडीक यांनी केले. आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, गवसे, धामणी या ठिकाणी खासदार फंडातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, अशोक चऱहाटी, मुकुंद देसाई, पंचायत समिती सभापती विष्णूपंत केसरकर, राजू झेलम यांच्या प्रमुख उपस्थित विकास कामांचा शुभारंभ झाला.

ग्रमीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी खासदार निधीतून भरीव निधी देण्याचा प्रयत्न आहे. वाडय़ावस्त्यांवर निधी पोहचला पाहिजे यासाठी कटिबद्ध आहे. असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिला.

यावेळी वसंत धुरे, जंबो गुरूलले, अर्जून कुंभार, जयसिंग चव्हाण, बंडू चौगुले, राजाराम चव्हाण, सुधाकर चौगुले, बशीर काकतीकर, सर्फराज बागवान, रामा कांबळे, महादेव पाटील, जनार्दन भोसले, संभाजी देसाई आदी उपस्थित होते