|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रभागात कार्यकर्त्याची जमावाजमव सुरू केली आहे. मंद्रुप पाणीपुरवठा योजनेला ‘ग्रीन सिग्रल’प्रभागात कार्यकर्त्याची जमावाजमव सुरू केली आहे. मंद्रुप पाणीपुरवठा योजनेला ‘ग्रीन सिग्रल’ 

पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिली प्रशासकीय मान्यता सहकारमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

वार्ताहर/ सोलापूर

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंद्रुप पाणीपुरवठा योजनेला सहकार, पणन व वस्त्राsद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मूळरूप प्राप्त झाले असून, प्रस्तावित 1083.89 लाख व 1127.25 लाख किंमतीच्या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे प्रलंबित या योजनेला ग्रीन सिग्रल मिळाल्याने मंदुपकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सोमवार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयावर बैठक लावली होती. या बैठकीत लोणीकर यांनी मंद्रुपच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देत नव्या वर्षाची भेट दिली आहे. यावेळी सहकार, पणन व वस्त्राsद्योग मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सांगली मंडळचे अधीक्षक अभियंता सु. ना. गरंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. बंडगर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग सोलापूर दोनचे उपअभियंता रमेश ढवळे उपस्थित होते.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या मंद्रुपमध्ये अनेक वर्षापासून भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या गावातील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट थांबविण्याचा चंग बांधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला. याबाबत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर बैठक लावून मंद्रुपच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविली. यामुळे भविष्यात मंद्रुपकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. हे निश्चित झाले आहे.

या बैठकीत पाणी आरक्षण प्रस्तावावरील लाभक्षेत्र विकास विभागाने उपस्थित केलेल्या शेतऱयांची त्वरित पूर्तता करून फेर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधितांना पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले. याशिवाय मागणीनुसार भीमा नदीवरून 0,87 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्याबाबतही जलसंपादा विभागाने कार्यवाही करावी, असेही आदेश देण्यात आले. शेरा पूर्तता केल्यानंतर पाणी आरक्षण जलसंपदा विभागाने मंजूर करावे व पाणी आरक्षण प्राप्त झाल्यानंतर सोलापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शासनाला तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असा आदेश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केल्यामुळै मंद्रुपच्या पाणी प्रश्नाला आता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, मंत्र्यांच्या आदेशानुसार सर्वच प्रक्रियांची तत्काळ कार्यवाही होऊन यांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बैठकीतील ठळक मुद्दे

प्रस्ताकि 1083.98 लाख निव्वळ व 1127.25 लाख किंमतीच्या योजनेला प्रशासकीय मंजूरी पाणी आरक्षण प्रस्तावावरील लाभक्षेत्र विकास विभागाने उपस्थित केलेलया शेऱयांची पूर्तता करून फेर प्रस्ताव सादर करणे मागणीनुसार भीमा नदीवरून 0.87 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्याबाबत जलसंपदा विभागाला कार्यवाहीचे आदेश शेरा पूर्तता केल्यानंतर पाणी आरक्षण मंजूर करण्याचे जलसंपदा विभागाला सूचना पाणी आरक्षण प्राप्त झाल्यानंतर सोलापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!