|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भोगीच्या भाज्यांची स्वस्ताई, पण शेतकरी-व्यावसायिकांवर संक्रांतभोगीच्या भाज्यांची स्वस्ताई, पण शेतकरी-व्यावसायिकांवर संक्रांत 

प्रतिनिधी/ सांगली

बाजारपेठेत आर्थिकमंदीमूळे ग्राहक फिरकेनासा झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर अक्षरशः गडगडले आहेत. त्यामुळे भोगी सणानिमित्त लागणाऱया मिश्र भाज्या खरेदी करताना गृहीणींसाठी स्वस्ताई असली, तरी व्यावसायिक व शेतकऱयांवर मात्र यंदाची संक्रांत नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच यंदा बाजरी 18 ते 20 रुपये किलो, तर राळय़ाचे तांदुळ 70 ते 80 रुपये किलो दराने मिळणार असल्याचे धान्य विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

 दोन महिन्यांपुर्वी केंद्रसरकारने केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम अजून बाजारपेठेवर जाणवत आहे. त्याचा सर्व व्यवसायांबरोबरच भाजी विक्री व्यवसायालाही फटका बसलेला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून भाज्यांच्या दरात घसरण झाली असून, टोमॅटो, वांगी, कांदा आदींसह अनेक भाज्यांचे दर गडगडले आहेत. सध्या बाजारपेठेत तुरळक आर्थिक व्यवहार सुरु असून, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱया भाज्यांना चांगलेच स्वस्ताईचे दिवस आले आहेत. त्यामुळे गृहीणी, सर्वसामान्य वर्ग खुशीत असलातरी, भाजी व्यावसायिक व शेतकऱयांवर मात्र संक्रांतीची कुऱहाड कोसळली आहे. दोन महिन्यामागे 80 रुपये किलो दराने विकली जाणारी वांगी महिना झाला तरी, 20 रुपयांवरच स्थिरावली आहेत. दोडकी 60 वरुन 40 रुपयांवर उतरली आहे. तसेच इतर भाज्यांचेही दर थोडय़ाफार फरकाने गडगडलेच आहेत. सगळय़ा भाज्या प्रतिकीलो 10 ते 20 रुपये दराने उतरल्या आहेत. यामध्ये टोमॅटो तर अक्षरशः 20 रुपयांवरुन 5 रुपयांवर घसरला आहे. ढबू मिरची, फ्लॉवर, हिरवी मिरची आदी भाज्या 50 रुपयांवरुन 20 रुपयांवर आलेल्या आहेत. मटारही 30 रुपये दराने विकला जात आहे. गवारी, कारली मात्र 60 रुपयांवर स्थिरावली आहेत. भाज्यांच्या स्वस्ताईमुळे भोगीसाठी लागणारी मिक्स भाजी 30रुपये दराने विकली जात आहे. त्याचबरोबर पालेभाज्याही मागील महिन्यात 15 ते 20 रुपये दराने विकल्या जात होत्या, पण त्या आता 5 ते 10 रुपये पेंडी विकली जात आहे. त्यामुळे अजूनही भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भाजीविक्रेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.  

 त्यामुळे शेतकरी व भाजी व्यावसायिकांवर संक्रांतीची कुऱहाड कोसळली असून, गेले महिना झाले, भाजी अक्षरशः मातीमोल दराने विकली जात आहे. त्यामुळे घातलेला खर्चही निघत नसल्याने, शिल्लकीला काहीच रहात नसून, भांडवलही निघत नसल्याचे, शेतकरी व व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. एकुणच यंदा स्वस्त भाज्यांमुळे  व्यावसायिकांवरच संक्रांत आल्याचे चित्र भाजीमंडईतून दिसून येत आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!