|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » तिरंग्याचे अवमान करणाऱया ऍमेझोनने अखेर ‘ती’ पायपुसणी हटवली

तिरंग्याचे अवमान करणाऱया ऍमेझोनने अखेर ‘ती’ पायपुसणी हटवली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऍमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा केल्यानंतर ऍमेझोन साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱया पायपुसणीची विक्री अखेर थांबवली आहे. त्यामुळे ऑमझोन ने अखेर माघार घेतली आहे.

कॅनडा येथील ऍमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. ही बाब एका नागरिकाने लक्षात आणून दिल्यानंतर याची दखल घेत सुषमा स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली. ‘आमच्या तिरंग्याची अपमान करणाऱया सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही ऍमेझॉनच्या अधिकाऱयांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या ऍमेझॉनच्या अधिकाऱयांना व्हिसा आहे,त्यांचा व्हिसा रद्द करू’. असे आव्हान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटच्या माध्यमातुन केली होती.