|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पै. अरुण बोंगार्डेकडून पै. संतोष शेळके चितपट

पै. अरुण बोंगार्डेकडून पै. संतोष शेळके चितपट 

प्रतिनिधी /निपाणी :
येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा उरुस उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी मैदानात कुमार केसरी अरुण बेंगार्डे याने शाहूपुरी तालीम कोल्हापूरच्या संतोष शेळकेला 15 व्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट केले. तर दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत शाहूपुरी तालमीच्या पै. अंकुश ढाकवालेने न्यू मोतीबाग कोल्हापूरच्या पै. संग्राम जाधवला 20 व्या मिनिटाला घिस्सा डावावरच चितपट केले.
येथील म्युनिसिपल हायस्कूलनजीकच्या संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात हे मैदान पार पडले. यावेळी शहर व परिसरातील कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या क्रमांकाची कुस्ती नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार व राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते तर दुसऱया क्रमांकाची कुस्ती बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते लावण्यात आली.
पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. बोंगार्डे याने पै. शेळके याच्यावर सुरुवातीपासूनच कब्जा घेतला होता. तर दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत चुरस दिसून आली. अन्य नेमलेल्या कुस्त्यांमध्ये पै. सचिन नारे-पांगिरे (बी) याने पै. विठ्ठल चिले-वारणा याला आस्मान दाखविले. अमोल बागव-शाहूपुरी याने ऋषिकेश अक्कोळते याच्यावर मात केली.
पै. सतीश अडसूळ-निढोरी व सत्यजीत पाटील-शाहूपुरी यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. शशिकांत बोंगार्डे-बानगेने अनिकेत राऊतवर, तेजस हेळवी-शाहूपुरीने शुभम पाटील-म्हाकवेवर, संतोष मेटकर-बानगेने सोहेल पटेल-शाहूपुरी, ओंकार पाटील-कुरणी याने संतोष नरोटे-शाहूपुरी, अक्षय साळवे-बानगेने अतुल मगदूम-न्यू मोतीबागवर मात केली. निलेश दुरुगडे-बानगे याने बबलू मदने-कोल्हापूरला, ओंकार लंबे-बानगेने गणेश जाधव-शाहूपुरीला तर शब्बीर शेख-इचलकरंजी याने ओंकार कोंडेकर-कळंबा याला आस्मान दाखविले. यावेळी पंच म्हणून झाकीर सय्यद, वसंत लांडगे, अशोक पावले, धोंडीराम पावले, शंकर कदम, बाळू कवडे, सुरेश लंबे, पितांबर कांबळे यांनी काम पाहिले.

Related posts: