|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चिंतामणीज्चे कायगावकर यांचे निधन

चिंतामणीज्चे कायगावकर यांचे निधन 

प्रतिनिधी /मुंबई :
सराफपेढी शृंखला असलेल्या चिंतामणीज् समुहाचे संस्थापक व अध्यक्ष अरुण शिवराम कायगावकर यांचे मंगळवारी येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी निर्मला, मुलगा चिंतामणी, सून वैजयंती व तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कायगावकर यांना गेल्या काही महिन्यांपासून किडनीचा त्रास होता. त्यावरील उपचारासाठी त्यांना येथील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
चिंतामणीज् ग्रुप अंतर्गत कायगावकर यांनी चिंतामणीज् या सराफ दालनांची साखळी मुंबई, ठाण्यासह गोव्यात उभारली. सराफ क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव अनेकांसाठी मार्गदर्शक ठरला. ‘ऑल इंडिया जेम्स ऍण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’सारख्या सराफ व्यवसायाशी निगडित अनेक संघटनांचे ते संस्थापक सदस्य होते.

Related posts: