|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » माजी मंत्री व काँग्रसचे नेते चंद्रकांत छाजेड यांचे निधन

माजी मंत्री व काँग्रसचे नेते चंद्रकांत छाजेड यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुण्याचे माजी महापौर, माजी राज्यमंत्री आणि काँग्रसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते 64 वर्षाचे होते.चंद्रकांत छाजेड गेल्या सहा दिवसांपासून आजरी होते. आज पहाटे त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने सकाळी 7.5 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली.

छाजेड यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता बोपोडीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजकीय क्षेत्रात मामू या नावाने लोकप्रिय असलेल्या छाजेड यांचा लोकसंग्रह आणि लोक संपर्क प्रचंड होता. पुणे महापालिकेवर पाचवेळा निवडून आलेल्या छाजेड यांनी पुण्याचे महापौरपद भुषवले होते. महपालिका सभागृह नेते म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर बोपोडी विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले हेते. त्यांनी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.

Related posts: