|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » 12 तासानंतर मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण

12 तासानंतर मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

तब्बल 12 तासानंतर मानखुर्दमधील मंडाळा परिसरात शेकडो झोपडय़ांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे, मात्र या घटनेत 2 जण जखमी झाले आहेत.

गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मंडाळा परिसरात शेकडो झोपडय़ांना आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आग्निशमन दलाला सोळा फायर इंजीन आणि पाच वॉटर टँकर घटनास्थळी पाठवावे लागले. रात्रभर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. वाहतूककोंडी आणि अरूदं रस्त्यांमुळे घटनास्थळी दाखल होण्यास आग्निशामन दलाला विलंब झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या आग्निशामन दलाच्या जवानांकडून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.