|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » रईस मधील ‘उडी उडी’ गाणे रिलीज

रईस मधील ‘उडी उडी’ गाणे रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

 

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटातील ‘उडी उडी’ गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. येत्या 25 जानेवारीला शहारूखचा बहुचर्चित ‘रईस’ चित्रपट रिलीज होणार आहे.

रिलीज होण्याआधी या चित्रपटाच्या ट्रेलरलाही मोठी पसंती मिळाली होती. शाहरूखचं वेगळा लूक आणि वेगळी भूमिका यातून बघायला मिळत असल्याने पसंतीही मिळाली आहे. गायक सुखविंदर सिंग, भूमी त्रिवेदी आणि करस्न सांगाथिया यांनी ‘उडी उडी जाए’ हे गाणे गायले आहे. तर गाण्याला राम संपत यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत.

 

Related posts: