|Monday, December 10, 2018
You are here: Home » Top News » तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु ; लष्कराप्रमुखांचा पाकला इशारा

तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु ; लष्कराप्रमुखांचा पाकला इशारा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताच्या जवळ असलेल्या देशाकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे सीमेपलीकडून होणारा गोळीबार सुरुच राहिला तर भारतीय लष्कराकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला जाऊ शकतो, असा गर्भित इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. सीमेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहेत. अलीकडील दिवसांत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना जरी कमी झाल्या असल्या पण असे झाले नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, रावत यांनी जवानांच्या तक्रारीबाबत ते म्हणाले, असंतुष्ट जवानांनी आपल्या तक्रारी सोशल मीडियावर करण्याची गरज नाही. जवानांच्या तक्रारींसाठी उत्तम व्यवस्था उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Related posts: