|Friday, July 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘सायकल’साठी लढाई : निकाल राखून

‘सायकल’साठी लढाई : निकाल राखून 

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकल्या, 17 ला पुढील सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

समाजवादी पक्षात फूट पडणार हे आता जवळपास निश्चित झाले असून शुक्रवारी निवडणूक आयोगाने मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोन्ही गटांची बाजू ऐकली आहे. त्यानंतर आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार असून त्या दिवशी निकाल होण्याची शक्यता आहे. सायकल हे चिन्हे गोठवले जाण्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.

या सुनावणीत मुलायमसिंग यादव यांनी सायकलवर दावा केला. अखिलेश गटाने काही दिवसांपूर्वी आयोजित केलेले पक्षाच्या कार्यकारिणीचे अधिवेशन बेकायदेशीर आणि पक्षाच्या घटनेविरोधात असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. तसेच समाजवादी पक्षात आपलेच बहुमत असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

अखिलेश यादव गटाची बाजू कपिल सिबल यांनी मांडली. त्यांनीही आपल्या गटाच्या बहुमताचा दावा केला. पक्षाचे बहुसंख्य आमदार, खासदार आणि पदाधिकारी अखिलेश यादव यांच्या बाजूचे असल्याचे ते म्हणाले. सुमारे चार तास दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केल्यानंतर आयोगाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

आयोग कोणता निकाल देणार ?

नियमानुसार आयोगाला कोणत्या गटाकडे बहुमत आहे याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. मात्र, बहुमतासंबंधी आयोगाची खात्री न पटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीपुरते सायकल हे चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता आहे. बहुमताची निश्चिती करण्यासाठी आयोगाला प्रतिज्ञापत्रे व पुरावे तपासून पहावे लागणार असून त्यांची छाननी करावी लागणार आहे. हे काम करण्यासाठी किती वेळ लागतो, यावर सायकल या चिन्हाचे भवितव्य ठरणार आहे. येत्या 8 फेबुवारीला राज्यात मतदानाचा पहिला टप्पा होणार आहे. त्या अगोदर किमात तीन आठवडे चिन्हासंबंधी अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.

Related posts: