|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘सेतू’तर्फे कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

‘सेतू’तर्फे कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धा संपन्न 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    सेतू या सामाजिक संस्थेतर्फे विवेकानंद जयंतीनिमित्त युवकदिनी कर्णबधीर मुलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये ‘वाचा’, ‘संभाषण’, चित्रकला व वेशभूषा या स्पर्धांमध्ये पाच जिल्हय़ातून सुमारे 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. समाजकल्याणचे सहआयुक्त विशाल लेंढे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते. यावेळी सूरेखा अग्रवाल, पंचगंगा बँकचे उपाध्यक्ष गिरीधर जोशी, पु. ना. गाडगीळ पेढीचे समीर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, अभय देशपांडे, ऍड.रवी भगवान, राजेंद्र भारवडेकर, उषा कुलकर्णी, अजित ढाणेकर, स्नेहल सपे, शशांक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते

Related posts: